##इतिहासात डोकावताना##-
*१७८९-अमेरीका देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची निवड झाली.
*१९३६-महात्मा गांधी यांनी वर्धा येथे सेवाग्राम आश्रमाची स्थापना केली.
*जन्म-
*१८७०-भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके.
*१९०९-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.संपूर्ण नाव-माणिक बंडोजी इंगळे.
*१९२६-मराठी संगीतकार-श्रीनिवास खळे
*१९८७-रोहित शर्मा -भारतीय क्रिकेट खेळाडू.
*चालू घडामोडी-
१.कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामधील लागू असणारे ताळेबंदीचे निर्बंध 15 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
२.राज्य सरकारने निर्बंध वाढवल्यामुळे प्रवास करण्यासाठी आवश्यक असलेल्या इ-पासची मुदत वाढ महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.
३.नाटककार व लेखक शेखर ताम्हणे यांचे निधन.
'सविता दामोदर परांजपे 'हे त्यांचे गाजलेले नाटक.
४.कोरोनामुळे झालेली महसूल कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकार कर्ज रोख्यांमधून चार हजार कोटींचा निधी सरकार उभारणार आहे.
५.बजाज उद्योग समूहाचे सचिव राहुल बजाज यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
६.आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर व भारत श्री 'किताब विजेते जगदीश लाड यांचे कोरोनामुळे निधन.
७.भारताने परकीय मदतीबाबतीच्या धोरणामध्ये बदल केला आहे.विदेशी देणग्या स्वीकारण्यास सुरुवात झाली.
#Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks

