अखेर आरोग्य विभागाच्या परीक्षांची तारीख आरोग्य विभागाद्वारे जाहीर करण्यात आली आहे .25 व 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या परीक्षा आता ग्रुप क - 24 व ग्रुप ड ची परीक्षा 31 ऑक्टोबर रोजी होणार आहेत.आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या सावळ्या गोंधळात परीक्षार्थी मात्र हैरान झाले आहेत.परीक्षेच्या केवळ काही तास आधी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगून परिक्षारथ्यांची आरोग्य विभागाने घोर निराशा केली होती .या सर्व गोष्टीबद्दल परिक्षार्थींची आरोगय मंत्री राजेश टोपे यांनी माफी देखील मागितली होती.यावेळी परीक्षा सेंटरचा गोंधळ रोखण्यासाठी 9 दिवस आधीच प्रवेशपत्र उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

