*आज आपण जाणून घेणार आहोत NDA म्हणजे काय,
तसेच त्यामध्ये प्रवेश कसा घ्यायचा याबद्दल ?
NDA अर्थात NATIONAL DEFENCE ACADEMY मराठीमध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी असे म्हणतात .हि एक सैनिकी प्रशिक्षण संस्था आहे .
*१९५४ मध्ये NDA ची स्थापन करण्यात आली.
*महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधून भारतीय संरक्षण दलातील अधिकारी घडवण्याचे काम राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात NDA संस्थेमध्ये केले जाते .येथे NDA ची परीक्षा तसेच मुलाखत पास करणाऱ्या उमेदवारांना भूदल ,वायुदल,तसेच हवाई दलातील अधिकारी होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रशिक्षण देण्यात येते .
*तर जाणून घेऊयात NDA Academy भारतामध्ये आहे कुठे?
NDA Academy भारतामध्ये महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात खडकवासला इथे निसर्गाच्या सानिध्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहे.
*NDA जॉईन कस करायचं ?
*NDAमध्ये प्रवेश घेण्यासाठी वर्षातून दोनवेळा पात्रता परीक्षा घेतली जाते.
*इयत्ता १२ उत्तीर्ण तसेच समकक्ष महाविद्यालयीन विद्यार्थी या पात्रता परीक्षेकरिता अर्ज करू शकतात.
*NDA मध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक पात्रतेच्या अटी -
१.उमेदवाराचे वयवर्ष १६ ते १९ दरम्यान असावे.
२.शैक्षणिक पात्रता -१२ वी परीक्षा उत्तीर्ण किवा समकक्ष .
३.लेखी परीक्षा -एकूण ९०० गुणांची परीक्षा
४.शारीरिक पात्रता -१५७.५ cm.
५.फक्त पुरुष उमेदवार NDA करता अर्ज करू शकतात .
*अनेक विद्यार्थी भारतीय संरक्षण दलामध्ये अधिकारी बनण्यासाठी NDA च्या परीक्षेची तयारी शालेय स्तरापासूनच सुरु करतात .NDA अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देशसेवेत संरक्षण अधिकारी म्हणून कार्यरत होण्याकरिता एक उत्तम मार्ग आहे .
अशा अनेक सरकारी तसेच इतर पदांची माहिती अशीच मिळवण्यासाठी आम्हाला Instagram,Facebook,Twitter,Telegram वर follow करायला विसरू नका .


