*चालू घडामोडी-
1.आज पर्यंत महाराष्ट्रामध्ये दिड कोटी नागरिकांचे लसीकरन करण्यात आले आहे.इथुन पुढे रोज 8 लाख लोकांचे लसीकरण करण्याचे राज्य शासनाने उद्दिष्ट ठेवले आहे.
2.महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोनाशी लढण्याकरिता आवश्यक असणारी वैद्यकीय सामुग्री ,व ऑक्सिजन ,रेमदेसीविर च्या उपल्भतेसाठी जागतिक निविदा काढली आहे.याद्वारे वैद्यकीय समुग्रीची खरेदी करण्यात येणार आहे.
3.ज्ञानेश्वरी चिंचोलीकर ही मुंबईची तरुणी नूयॉर्क बार कौन्सिल मध्ये अटर्नि म्हणून काम करण्यास पात्र ठरली आहे.
4.आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या रुग्णांना महात्मा फुले जीवनदायी योजने अंतर्गत कोविडवरील उपचार मोफत मिळून देने ही राज्याची जबाबदारी असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्पष्ट केले आहे.
5.कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मे महिन्यात होणारी सीए (सनदी लेखापाल)अभ्यासक्रमाच्या होणाऱ्या परिक्क्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
6.मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगास कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस जबाबदार धरल्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणूक जिंकल्या नंतर विजयी मिरवणूक काढण्यास बंदी घातली आहे.
7.रशियाची स्पुतनिक व्ही ही लस भारतामध्ये मे महिन्याच्या अखेरपर्यंत उपलब्ध होईल अशी माहिती भारतामध्ये ही लस आयात आणि उत्पादन करणाऱ्या हैदराबाद येथील रेड्डीज लॅबोरेटरी या कंपनीने सांगितले आहे.
8.कोरोनाचा वाढता प्रसार पाहता ही आणीबाणी नाहीतर काय असा सवाल? केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे.
9.ग्राहक समाधान सर्व्हे करण्याचा रिजर्व बँकेने निर्णय घेतला आहे.अलीकडील काळात करण्यात आलेल्या सरकारी मालकीच्या बँकांच्या विलनिकरणाचा ग्राहक सेवेवर काही परिणाम झाला आहे का?हे जाणून घेणे हा यामागील उददेश आहे.
10.दिल्लीमध्ये वाढत्या कोरोनाच्या संक्रमनामुळे प्राणवायू अर्थात ऑक्सिजन ची प्रचंड प्रमाणात कमतरता भासत आहे .याच पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने फ्रान्स व थायलंड कडून ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
