गुरुवार, १३ मे, २०२१

चालू घडामोडी 13मे




 *इतिहासात डोकावताना##

*


*जन्म-

*1857-नोबेल पारितोषिक विजेते डॉ.सर रोनाल्ड रॉस

*1905-भारताचे 5वे राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद 

*1951-भारतीय संगीतकार आनंद मोडक



*मृत्यू-

2013-भारतीय छायाचित्रकार जगदीश माळी.




*चालू घडामोडी-


1.मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)ने सर्व पदांसाठीची भरती प्रक्रिया थांबवली आहे.


2.कोरोनाची रुग्णसंख्या  राज्याच्या ग्रामीण भागातही वाढत आहे .ग्रामीण भागातील स्थिती गंभीर बनत आहे ,मुंबई पासून जवळ असणाऱ्या पालघरची हीच स्थिती आजर तुला पार्श्वभूमीवर राज्य सरकारला गतमीन भागातील कोरोना स्थिती आटोक्यात आणण्यासाठी लक्ष केंद्रित करण्याच्या सुचना उच्च न्यायालयाने केल्या आहेत.


3.देशातील ईथेनॉल पासून ऑक्सिजन निर्माण करण्याचा पहिला प्रकल्प यशस्वी झाला आहे .औरंगाबाद मधील धाराशिव कारखाना येथे हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवला गेला आहे.


4.भारतीय साखर उद्योगात इतिहास लवकरच घडण्याची शक्यता आहे.


5.कोरोनाच्या उपचारासाठी वापरण्यात येणारे रेमदेसीविर औषधांचा  पुरेसा पुरवठा करण्यात अपयशी ठरल्यामुळे केंद्र व राज्य सरकारला स्पष्टीकरण देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.



6.दोन कोटी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस केंद्र सरकार विविध राज्यांना देणार आहे.या डोससाठी 45 वर्षांवरील दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्य देण्याची सूचना राज्यांना केंद्र सरकारने केल्या आहेत.


7.2 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीसाठी चाचणीला केंद्रीय औषध प्रमाण नियंत्रण मंडळाने मंजुरी दिली आहे.


8.जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लसीचे भारतात उत्पादन करण्यासाठी व त्याकरिता भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी अमेरिका उत्सुक असल्याचे अमेरिकी दूतावास प्रमुख डयानिअल बी स्मिथ यांनी म्हटले आहे.