बुधवार, ५ मे, २०२१

चालू घडामोडी 4 मे

 *चालू घडामोडी-



१.अभियांत्रिकी तंत्रज्ञान,अभ्यासक्रम प्रवेशासाठी आवश्यक असणारी प्रवेश परीक्षा jee कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव मुळे पुढे ढकलण्यात आली आहे.याबाबतची अधिकृत घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी केली.


२.कोरोना काळामध्ये आई वडिलांचे निधन झाल्यामुळे मुल दत्तक द्यायचे आहे असे सोशल मीडियावर मेसेज व्हायरल होत आहेत .बालकांचे दत्तक देण्याच्या नावाखाली विक्री होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.याची राज्य सरकारने दखल घेतली आहे.महिला व बाल कल्याण विभागाने आशा समाज कंटकांवर कठोर कारवाईचा  इशारा दिला आहे.


३.कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे एप्रिल महिन्यात ७५लाख लोक बेरोजगार झाले आहेत.देशातील बेरोजगारीचा दर ८टक्क्यांनी वाढला आहे.सेंटर फॉर मोनिटरिंग इंडियन इकॉनॉमी ने केलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे.


४.वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमिअर लीग(IPL)चे सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.


५.जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल व माजी केंद्रीय मंत्री जगमोहन यांचे निधन.


६.भारत सरकारने दूर संचार क्षेत्रातील 5g नेटवर्क चाचण्यांना परवानगी दिली आहे.


७.राज्यातील पोलिस महासंचालक पदि  ३अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.विवेक फणसाळकर,के.व्यंकटेशम,संदीप बिष्णोई याना डिजी पदावर बढती देण्यात आली आहे.


८.गृहखरेदीदार आणि बांधकाम व्यवसायिकांमधील तक्रारींचे निराकरण करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे.महारेराच्या अंमलबजावणीस चार वर्षे पूर्ण झाली आहेत.


९.भारत व ब्रिटन यांच्यादरम्यान सुरक्षा,व्यापार,संरक्षण,आरोग्य इत्यादी क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी येत्या १०वर्षासाठीचे धोरण ठरवण्याचा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन,व नरेंद्र मोदि यांच्या दरम्यान झालेल्या शिखर परिषदेत निर्णय घेण्यात आला.




sankalponlineworks आता  TELEGRAM वरही उपलब्ध


##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks         


##Join us on youtube##