बुधवार, १२ मे, २०२१

*चालू घडामोडी १२ मे



##इतिहासात डोकावताना##


*1666-छत्रपती शिवाजी महाराज व औरंजेब यांची आग्रा येथे भेट.

*1952-प्रजासत्ताक भारताचे पहिले संसदीय अधिवेशन सुरू झाले.


*जन्म-

*1895-भारतीय तत्वज्ञ जे.कृष्णमूर्ती 

*1905-आत्माराम रावजी भट-मराठा चेंबर ऑफ कॉमर्स चे संस्थापक.



*चालू घडामोडी १२ मे 


१.राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने  महाराष्ट्र  राज्य लोकसेवा आयोग (MPSC)कडे सर्व प्रकारची नोकरभरती राबवण्यास तयारी आहे का अशी विचारणा केली होती यावर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने_(MPSC ) सहमती दर्शवली आहे.


२.कोरोनामुळे २२८  एसटी कर्मचाऱ्यांचा  मृत्यु झाला आहे .कोरोनामुळे मृत्यु झालेल्या अशा  एसटीकर्मचार्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर तातडीने सेवेत घेण्याच्या सूचना राज्याचे परिवहन मंत्री  व एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब  यांनी  एसटी  महामंडळस केली आहे .


3.केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने मागील वर्षी कोरोन काळात रद्द झालेल्या देश विदेशातील सहलींच्या शुल्काचा परतावा ग्राहकांना नाक्रणाऱ्या कंपन्यांना नोटीसा बजावल्या आहेत.


४.२०२७ मध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये १० एवजी १४ संघांचा समावेश करण्याबाबत आयसीसी प्रयत्नशील आहे .कोरोना महामारीमुळे झालेले आर्थिक नुकसान भरपाई व बिगर नामांकित अंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळणे हा यामागील हेतू आहे .


५.क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या MCC क्लबने बांबूपासून बनवलेली ब्याट वापरणे हे अनधिकृत असल्याचे म्हटले आहे .


6.केरळमधील जेष्ठ कम्युनिस्ट के .आर .गौरी अम्मा यांचे  11 मे रोजी निधन झाले.1957 मध्ये पहिल्यांदा केरळ मध्ये निवडून आलेल्या डाव्या मंत्रीमंडळमध्ये एकमेव महिला  म्हणून त्यांनी काम पाहिले होते.केरळ च्या विधानसभेवर त्या 10 वेळेस निवडून गेल्या होत्या.विविध सरकारमध्ये 16 वर्षे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले होते



7.आंतराष्ट्रीय स्तरावरील पातमानांकन संस्था मूडीज ने वाढत्या कोरोनाच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्था नाजूक वळणावर असल्याने जागतिक पातमानांकन घसरण्याची शक्यता व्यक्त केली आहे.


8.देशातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात ब्रिटन येथे होणाऱ्या G7शिखर परिषदेकरिता जाणार नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.


9.नासाचे ओसीरिक्स नावाचे यंत्रमानव यान अवकाशातील प्राचीन खडकाचे अवशेष घेऊन पृथ्वी च्या दिशेने ,मार्गस्थ झाले आहे .


10.12 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांकरिता फायझर या लस उत्पादक कंपनीने तयार केलेल्या लसीला अमेरिकेच्या औषध नियंत्रकानी मान्यता दिली आहे.13 तारखेपासून अमेरिकेत 12 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार आहे.



sankalponline0@gmail.com

*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस

*sankalponlineworks आता  TELEGRAM वरही उपलब्ध

#Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks         


##Join us on youtube##