##इतिहासात डोकावताना##
*जन्म-
1910-चित्रपट दिग्दर्शक राजा परांजपे
1973-सचिन रमेश तेंडुलकर
*मृत्यू
1942-मराठी नाट्यसंगीत गायक व अभिनेते मास्टर दीनानाथ मंगेशकर
1960-अण्णासाहेब भोपटकर (नामवंत वकील)
1994-उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर
*चालू घडामोडी
1.महाराष्ट्र रात्यामधून इतर राज्यात व राज्यातील एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी नागरिकांना e पास घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य सरकारने वाढत्या कोरोनाच्या प्रभावामुळे कडक नियमांची अंमलबजावणी करताना जिल्हा बंदी करण्यात आली आहे त्यामुळेच आता epaas प्रवास करण्यासाठी आवश्यक आहे.
2.महाराष्ट्र राज्य शासनाच्या सेवेमधील गट ब व गट क मधील रिक्त असणारी पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया खाजगी कंपन्यांद्वारे राबावण्यात येणार आहे.राज्य शासन 5 खाजगी कंपन्यांकडे स्पर्धा परीक्षा घेण्याची जबाबदारी सोपवली आहे.
3.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणतज्ञा डॉ.अरुण नागवेकर यांचे निधन.
4.सरन्यायाधीश शरद बोबडे हे सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले.
5.भारताचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायाधीश एन.व्ही. रमना यांनी शपथ घेतली . राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना शपथ दिली.
6.युजीसी (under graduate course)ने देशातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांना महिला सुरक्षा आणि लिंग समानतेबाबत जागृतीचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याची सूचना केली आहे.
7.देशभरातील जनतेचे कोरोनामुळे जगणे अवघड होतं चालले आहे.रोजगार बंद पडल्याने कित्येक जणांचे दोन वेळच्या जेवणाचेही अवघड झाले आहे.याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार देशातील जवळपास 80 कोटी जनतेस दोन महिन्यांकरिता मोफत प्रत्येकी 5 किलो अन्नधान्य देणार आहे.या योजनेतील लाभार्थीना गहू ,तांदूळ यासारखे5 किलो प्रत्येकी धान्य मोफत दिले जाणार आहे.
8.कोरोनाच्या उपचारासाठी गुजरातच्या झाईड्स कँडीला या कंपणीच्या व्हीराफिन या औषधाच्या आपत्कालीन वापरला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.
9.भारतातील वाढत्या कोरोनाच्या रुग्ण संख्यामुळे भारतातील प्रवाश्यांना 10 देशांनी प्रवेशबंदी जाहीर केली आहे.अमेरिका,ब्रिटन,जपान,हॉंगकॉंग, सिंगापूर,औस्ट्रेलिया, फ्रांस,कॅनडा,ओमान,अरब अमिराती,नुझीलंड हे ते 10 देश आहेत.
10.जर्मनीतून 23 ऑक्सिजन उत्पादन सयंत्र हवाई मार्गाने देशाचे संरक्षण मंत्रालय भारतात आणणार आहे.या प्रत्येक सयंत्राची प्रतिमिनट 40 लिटर ऑक्सिजन उत्पादन क्षमता आहे.
रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता SUBSCRIBE नक्की करा !!
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
![]() |
| Youtube |

