##इतिहासात डोकावताना##
*जन्म-
*1564-विल्यम शेक्सपिअर
*1908-भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सर्वमित्र सेकरी.
*मृत्यू -
*1920-श्रीनिवास रामानुजन भारतीय गणिततज्ञ
*1924-रमाबाई रानडे
*1976-मराठी साहित्यिक,आरती प्रभू उर्फ चिंतामण त्रंबक खानोलकर .
*1956-भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांनि देशातील पहिल्या वृत्तपत्र कागद कारखान्याचे उदघाटन केले.
*1962-रेंजर -4 हे नासाचे चांद्र यान चंद्रावर कोसळले.
*.1995-आशियाई विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहोताने इंटरनॅशनल वूमन मास्टर 'किताब मिळवला.
*चालू घडामोडी -
1.जेष्ठ कबड्डी प्रशिक्षक प्रशांत भाबड यांचे निधन.
2.बनारस घराण्याचे प्रख्यात गायक पंडित राजन मिश्र यांचे निधन.
३.होप या संस्थेकडून महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनामध्ये दिले जाणारे पुरस्कार महाराष्ट्रातील तीन जणांना जाहीर झाले आहेत.
उदयोन्मुख पक्षीनिरीक्षक पुरस्कार -चिन्मय प्रकाश सावंत(सातारा)
उदयोन्मुख पक्षीमित्र -राहुल श्रीकृष्ण वंजारी(सोलापूर),मृणाली कमलाकर राऊत.
4.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लावलेल्या कडक निर्बंधांमुळे उद्योगधंदे बंद पडल्यामुळे कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेउन राज्याच्या कामगार विभागाने कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी तक्रार निवारण कक्ष सुरू केला आहे.
5.देशात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे ऑक्सिजन काँसंनट्रेटर यंत्र व ऑक्सिजन ची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे.चिनहून होणारी आयात बंद असल्याने या यंत्राच्या किमतीमध्ये दुप्पट वाढ झाली आहे.
6.1 एप्रिल पासुन नवीन वेतनसंहिता केंद्र सरकार लागू करणार आहे.या वेतन संहितेचा नोकरदारांना लाभ होणार आहे.या संहितेनुसार कामाचे तास वाढणार आहेत.यानुसार आणखी 15 ते 30 मिनिटे जास्तीचे काम केल्यास तो ओवर टाइम गणला जाणार आहे.
7.पीएफआरडीए (पेंशन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण)द्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतर्गत असणाऱ्या खात्यात 2020-21 मध्ये 23 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
8.केंद्र सरकारच्या आदेशानंतर कोरोना महामारीविषयी खोट्या बातम्या पसर्वणार्या 100 पोस्ट फेसबुक, ट्विटर या समाज माध्यमांनी हटवल्या आहेत.
9.पीएमो अर्थात पंतप्रधान कार्यालयाने पीएम केअर्स फंडमधील निधीतून देशभरामधील सरकारी रुग्णालयामध्ये 551 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
10.दिल्ली सरकारने व गुजरात सरकारने राज्यातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे
11.मारुती उद्योग समूहाचे माजी प्रमुख जगदीश खट्टर यांचे निधन.
12.कोरोनाची दुसरी लाट भारतामध्ये आली आहे.या संकटात भारताला मदत करण्याचे अनेक देशांनी आश्वासन दिले आहे.ब्रिटन,अमेरिका,सिंगापूर ,सौदी अरेबिया यांनी भारताला ऑक्सिजन ची मदत केली आहे.
वाचण्याकरिता SUBSCRIBE नक्की करा !!
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
| ##Join telegram## |
| ##follow us on instagr |
![]() |
| ##Join us on youtube## |

