वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने MPSC ची 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. MPSC च्या विद्यार्थ्यांमध्ये या बाबत दोन प्रकारचे विचार मत प्रवाह आहेत,काही विद्यार्थ्यांना परीक्षा होणे महत्वाचे वाटत होते,तर काही विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुढे ढकलणे योग्य वाटत होते अखेर राज्य सरकारने ही MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा आज निर्णय घेतला आहे.परीक्षेची नवी तारीख सध्या जाहीर करण्यात आली नाही.
