गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

रोजच्या चालू घडामोडी २२/०४/२०२१

 

##इतिहासात डोकावताना -

*जन्म -

*१९१४ -बलदेव राज चोप्रा (हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक व निर्माते होते)

*१९३५- भामा श्रीनिवासन -भारतीय अमेरिकन गणिततज्ञ 

*मृत्यू -

*१७४० -पहिले  बाजीराव पेशवा 

*२०१३-भारताचे २७ वे सरन्यायाधीश जगदीशशरण वर्मा .





*चालू घडामोडी 

१.आज रात्रीपासून राज्यामध्ये कठोर निर्बंधांची अमलबजावणी करण्यात येणार आहे.या नियमानुसार राज्यामध्ये पुन्हा जिल्हा बंदी होणार आहे या नियमांची आज रात्रीपासून अमलबजावणी सुरु होणार आहे .सर्वसामान्यांना लोकल च्या प्रवासासाठी बंदी घालण्यात आली आहे ,फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार आहे .


२.राज्यातील वैद्यकीय सामग्री खरेदीसाठी व कोरोनावरील उपाय्योजना जलद गतीने होण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे .

३.महाराष्ट्र राज्यातील तुरुंगामधील २४६ कैदी कोरोना बाधित झाले आहेत .राज्यामध्ये कैद्यांमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढत आहे .भायखळा येथील महिला कारागृहात सर्वाधिक कैद्यांना लागण  झाली आहे .यामध्ये शीण बोरा हत्याकांडामुळे चर्चेत राहिलेली इंद्राणी मुखर्जी हिलाही कोरोनाची लागण झाली आहे .

४   .दिल्ली मध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे .दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीतील दवाखान्यांना कुठल्याही पद्धतीने का होईना पण ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यावा असे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत.निर्देश देताना न्यायालयाने टाटा यांचे उदाहरण दिले कि टाटा यांनी त्यांच्या प्रकल्पामधील तयार केलेला ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी दिला तर बाकीच्या पोलाद कंपन्या का असे करू शकत नाहीत असा सवाल कोर्टाने उपस्थित केला आहे.


५.  कोविशिल्ड या सिरम इन्स्टिट्यूट ने तयार केलेल्या लसीच्या डोसचे नवे सिरम इन्स्टिट्यूट ने जारी  केले  आहेत .त्यानुसार केंद्र १५०रुपये ,राज्याला ४०० रुपये ,तर खाजगी दवाखान्यांना ६०० रुपये किमतीत लस मिळणार आहे .


६. .कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंखेच्या पार्श्वभूमीवर सर्वोच न्यायालयाने २२ एप्रिल पासून तातडीच्या  खटल्याची सुनावणी सोडता इतर खटल्यांची सुनावणी पुढील आदेश येईपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे .


७.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एकूण ९५ दिवसांमध्ये १३ कोटी जणांना लस देण्यात आली आहे .अमेरिका व चीनला हे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता अनुक्रमे १०१ व १०९ दिवस लागले होते .


८.कोरोनाची लस तयार करणाऱ्या भारत बायोटेक या कंपनीने भारत बायोटेक द्वारा निर्मित कोव्ह्याक्सीन हि लस ७८ टक्के परिणामकारक असल्याचे सांगितले आहे .कोव्ह्याक्सीन लस घेतल्यानंतर कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता १०० टक्क्यांनी कमी असल्याचे कंपनीने सांगितले .

९.केंद्र सरकारने १ मे पासून १ वर्षांवरील सर्वाचे  लसीकरण  करण्याचा निर्णय घेतला आहे .यानुसार २४ एप्रिलपासून कोविन या लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी आवश्यक app वर नोंदणी करण्यास सुरुवात होणार आहे .

१०..फायझर  ने न नफा न तोटा दरात लसीचा भारत सरकार राबवत असलेल्या लसीकरणाच्या कार्यक्रमाकरिता  पुरवठा करण्याची ऑफर भारत सरकारला दिली आहे .फायझर हि अमेरिकन लस उत्पादक कंपनी आहे .