*चालू घडामोडी
1.महाराष्ट्र राज्यातील ताळेबंदीचे कठोर नियम येत्या 31 मे पर्यंत वाढवन्यात आले आहेत.
2.कोव्याकसीन या कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करण्याकरिता भारत बायोटेक कंपनीच्या सहकारी कंपनी असणाऱ्या बायोवेट प्रायव्हेट ली.या कंपनीला पुन्यामधील 12 हेक्टर भूखंड ताब्यात घेण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.यासोबतच राज्य सरकारने परवानगी देण्याचे निर्देशही राज्य सरकारला दिले आहेत.
3.आसाम राज्याचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिसवा सर्मा यांनी शपथ घेतली .त्यांच्यासह 13 कॅबिनेट मंत्र्यांनीही शपथ घेतली .
4.भारतीय रिजर्व बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून जोस .जे कट्टर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
5.आयपीएल चे उर्वरित 31 सामने भारतामध्ये खेळवले जाणार नसल्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्ट केले आहे.
6.अमेरिकेकडून भारताला कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी 50 कोटी डॉलरचे अर्थसहाय्य व वैद्यकीय उपकरणाची मदत करण्यात आली आहे.
7.नेपाळमधील के.पी .शर्मा ओली सरकार बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरले आहे.नेपाळच्या संसदेत मांडण्यात आलेल्या विश्वासदर्शक प्रस्तावात ओली सरकारचा प्रभाव झाला.
#Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
![]() |
| ##Join us on youtube## |

