##इतिहासात डोकावताना##
*जन्म-
*1861-नोबल परितोषक विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर
*1880-भारतरत्न कायदेपंडित पांडुरंग वामन काणे.
*1912-ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कादंबरीकार पन्नालाल पटेल.
*मृत्यू-
*2001-गीतकार प्रेम धवन
*2002-दुर्गाबाई भागवत-मराठी लेखिका
*चालू घडामोडी-
1.मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर केलेल्या कठोर मते हटविण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.निवडणूक आयोगाने मद्रास उच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
2.राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचे निधन.माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचे ते पुत्र होते.
3.कोरोनाची येणारी तिसरी लाट ही अधिक धोकादायक असणार असल्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कोरोनाच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेस सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याची सूचना केली आहे.
4.केंद्र सरकारद्वारे पुरवण्यात आलेल्या लसीमधील एकही लस वाया न जाऊ देण्याचा केरळ राज्याने विक्रम केला आहे.यासोबतच मिळालेल्या लसीपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण करण्याचा विक्रम केरळने केला आहे.याबाबत केरळचे मुख्यमंत्री पिणाइ विजयन यांचे पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले आहे.
5.एलआयसी (लाईफ इन्श्युरन्स कंपनी)मध्ये आता पाच दिवसांचा आठवडा 10 मेपासून होणार अंमलबजावणी शनिवार व रविवारी सुट्टी.
7.महसुली तूट भरपाई करीता केंद्र सरकारद्वारे 17 राज्यांना 9817 हजार कोटी रुपये दुसऱ्या मासिक हप्त्याद्वारे मंजूर.
8.चीनने प्रक्षेपित केलेले मार्च 5 बी हे रॉकेट भरकटले आहे .दिशा भरकटलेल्या स्थितीत हे रॉकेट पृथ्वीवर येत आहे .८ मे रोजी या रॉकेटचा मोठा भाग पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता आहे.हे रॉकेट 21 टन वजनी आहे.
9.बौद्धिक संपदा संरक्षण नियमांमधून कोविड 19 विषाणूच्या लसीला वगळण्याच्या प्रस्तावाला अमेरिकेने समर्थन दिले आहे.यास मान्यता मिळाल्यास लस पेटंट मुक्त होऊन सर्वाना उत्पादनासाठी खुली होईल.

