*इतिहासात डोकावताना##
*1718-जगातील पहिल्या मशीन गनचे पेटंट जेम्स पकल ने घेतले.
*1958-स्फुटनिक 3 या उपग्रहाच्या सोव्हिएत संघाने प्रक्षेपण केले.
*जन्म-
*1817-बंगाली लेखक व समाजसुधारक देवेंद्रनाथ टागोर
*मृत्यू-स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख जनरल एम.के. करीअप्पा
*चालू घडामोडी-
1.स्टार युनियन दायची लाईफ इन्शुरन्स या कम्पणीच्या मुख्याधिकारी पदी अभय तिवारी यांची निवड.
2.देशामध्ये येत्या काही महिन्यातच आणखी 5 कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध होणार असल्याचे नीती आयोगाने स्पष्ट केले आहे.
3.रशियाची स्पुतनिक व्ही ही लस भारतात दाखल झाली आहे,याचा पहिला डोस हैदराबाद मध्ये देण्यात आला आहे.
4.देशातील कोरोना प्रतिबंधक लसींची टंचाई दूर करण्यासाठी भारत बायोटेक कंपनी द्वारा निर्मित कोव्याकसीन लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.केंद्र सरकारने कोव्याकसीन लस निर्मितीचा फॉर्म्युला इतर कंपन्यांना देण्याची तयारी दर्शवली आहे.
5.देशामध्ये जाणवणारा कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्र सरकार 16 ते 31 मे दरम्यान राज्य सरकारांना 1 कोटी 92 लाख लसींची पुरवठा करणार असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केले.
6.मोबाईल फोन रिचार्ज करताना मासिक प्लॅन 28 दिवसांचाच असतो .यामुळे ग्राहकांना मात्र वर्षातून 12 ऐवजी 13 वेळा रिचार्ज करावा लागतो यामुळे ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत याचीच दखल घेत 'ट्राय' (टेलिकॉम नियंत्रण मंडळ)ने या बाबत टेलिकॉम कंपन्या ना स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.
7.नेपाळचे पंतप्रधान म्हणून के.पी.शर्मा ओली यांनि शपथ घेतली. गेल्या काही दिवसांपूर्वी ओली यांच्या सरकारमधील सहकारी पक्षाने पाठिंबा काढून घेतल्याने ओली यांचे सरकार अल्प मतांमध्ये आले होते ,त्यांनंतर झालेल्या बहुमत चाचणीत ओली अपयशी ठरले व ओली सरकार पडले ,मात्र विरोधकांना बहुमत स्पष्ट न करता आल्यामुळे ओली याना सरकार स्थापन करता आले ,आता त्यांना महिनाभ्रमध्ये बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
![]() |
| ##Join us on youtube## |

