रविवार, १ ऑगस्ट, २०२१

दहावीच्या विद्यार्थ्यांना या दिवसापासून मिळणार गुणपत्रिका(मार्कशीट)!

 दहावीच्या विद्यार्थ्यांना या दिवसापासून मिळणार गुणपत्रिका(मार्कशीट)!



     महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता 10 विचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर केला होता.विद्यार्थी मात्र पास होऊनही मार्कशीट च्या प्रतीक्षा करावी लागत होती.अखेर आता ही प्रतीक्षा संपणार आहे.महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केल्यानुसार दिनांक 09 ऑगस्ट 2021 पासून विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमध्ये मार्कशीट चे वाटप सुरू करण्यात येणार आहे.संबंधित शाळांनी कोरोनाच्या नियमांचे निकष पाळून 09 ऑगस्टपासून त्यांच्या सोईनुसार मार्कशीट चे वितरण करण्याच्या सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे देण्यात आल्या आहेत.



    महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अंतर्गत 22 हजार 767 शाळांमधून 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी पास झाले आहेत.राज्य शिक्षण मंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे निकाल लागल्यानंतर तब्बल 24 दिवसांनंतर विद्यार्थ्यांच्या हातात मार्कशीट मिळणार आहेत.यात आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की ज्या विद्यार्थ्यांना काही कारणामुळे निकाल न मिळाल्यास शिक्षण मंडळाशी शाळांनी तातडीने संपर्क साधावा असे स्पष्ट करण्यात आले आहे.तर येत्या 09 ऑगस्ट रोजी शाळेमध्ये भेट द्या व आपले मार्कशीट घेऊन या!