मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

17 ऑगस्टपासून होणार राज्यातील शाळा सुरू!

 *17 ऑगस्टपासून होणार राज्यातील शाळा सुरू!




महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने शाळांसाठी नवी नियमावली जरी केली आहे .त्यानुसार राज्य सरकार येत्या 17 ऑगस्टपासून राज्यातील 5 वि ते 7वि पर्यंतच्या शाळा उघडणार आहे.



*शाळांसाठी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना-


*हेही वाचा -11 वि CET परीक्षा रद्द!


1.एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल अशी आसनव्यवस्था  असावी ,व प्रत्येक 2 बेंच मध्ये 6 फुटांच अंतर असावं.


2.एका वर्गामध्ये जास्तीतजास्त 15 ते 20 विद्यार्थी बसवले जावेत.


3.शाळेमध्ये कोरोनाग्रस्त विद्यार्थी  आढळून आल्यास शाळा तात्काळ बंद करण्यात यावी.


4.कोरोनाग्रस्त विद्यार्थी आढळून आल्यानंतर शाळा निर्जंतुक करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकावर असणार.


5.शाळा सुरू करण्यासाठी गावातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असायला हवा.


6.विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या परिसरात प्रवेश करू देऊ नये.


7.शाळा सुरू करीत असताना विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने बोलवले जावे.


8.शाळेतील शिक्षक वर्गांना गावातच राहण्याची व्यवस्था असावी.


9.सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर शिक्षकांनी शक्यतो  टाळावा.


*अशाप्रकारच्या सूचना राज्य शिक्षण विभागाने सर्व शाळांसाठी मार्गदर्शक जाहीर केल्या आहेत.