शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१

* महाराष्ट्र राज्य पोलीस भरती -अशी करा कॅटेगरी अपडेट !

* महाराष्ट्र राज्य पोलीस भरती - कॅटेगरी  अपडेट  करण्यास मुदतवाढ⏱️⏱️

* महाराष्ट्र राज्य पोलीस भरती -अशी करा कॅटेगरी अपडेट !



          महाराष्ट्र राज्यातील बहु प्रतीक्षित पोलीस भरतीबाबत शासनाने नवीन शुद्धीपत्रक काढले आहे .त्यानुसार पोलीस भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षे संदर्भातील माहिती  उमेदवारास उमेदवाराने अर्जात दिलेल्या  मोबाईल नंबर किवा इमेल आयडीद्वारे कळवण्यात येईल .माननीय सर्वोच्च न्यायालयाने SEBC आरक्षण रद्द ठरवल्यामुळे SEBC कॅटेगरी मधील अर्जदारांना आरक्षित असलेल्या जागा अराखीव (खुल्या)प्रवर्गातून समाविष्टीत केले जाणार आहे.

*SEBC कॅटेगरी मधून अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी देण्यात आलेल्या महत्वाच्या सूचना -

१.आरक्षण रद्द झाल्यामुळे sebc तील अर्जदारांना आता open कॅटेगरी मधून अर्ज करावा लागणार आहे .

२.ज्या अर्जदारांनी अर्ज करताना sebc कॅटेगरी मधून अर्ज केलेला असेल त्यांनी ews किवा ओपेन कॅटेगरी चे सिलेक्शन लॉग इन करून बदलावे .

३.हा बदल केल्यानंतर पासवर्ड बदलावा ,तसेच प्रत्येक  उमेदवाराने आपला पासवर्ड बदलावा 

४.ज्या उमेदवारांनी अराखीव प्रवर्गाकरिता विहित करण्यात आलेली वयोमर्यादा ओलांडली असेल त्यांच्याकरिता मागास वर्गीयांना देय असलेल्या वयोमर्यादा व शुल्क सवलत कायम ठेवण्यात येईल . 

*परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होईल .

*sebc कॅटेगरी तील उमेदवारांना ओपण कॅटेगरीतून ०५-०८-२०२१ पासून -०८-२०२१ अर्ज सुधार करण्यास मुदत देण्यात आली आहे .

*कॅटेगरी कशी अपडेट करावी ?-

   खाली लिंक दिली आहे त्या लिंकमधील उमेदवाराने आपला विभाग निवडून वेबसाईटवर क्लिक करावे .लॉग इन चे पेज दिसेल त्यामध्ये आपला रजिस्टर क्रमांक टाकावा.लॉग इन होईल त्यानंतर कॅटेगरी निवडावी व पासवर्ड बदलावा .

             


*कॅटेगरी अपडेट करण्यासाठी -क्लिक करा

  * शुद्धीपत्रक -पहा