सोमवार, २० सप्टेंबर, २०२१

*महाराष्ट्र डाक विभाग पोस्टमन भरती २०२१ रिझल्ट होणार लवकरच जाहीर .परीक्षा दिलेल्या उमेदवारांना पाहता येणार सोडवलेला पेपर !

 *महाराष्ट्र डाक विभाग  पोस्टमन भरती २०२१ रिझल्ट होणार लवकरच जाहीर !

*महराष्ट्र सर्कल पोस्टमन भरती परीक्षा २०२१ चा लवकरच रिझल्ट जाहीर होणार आहे .महाराष्ट्र पोस्टल सर्कल द्वारे पोस्टमन,मेलगार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS )या पदांच्या १३७१ जागांकरिता ०५ ते २९ जानेवारी २०२१ दरम्यान परीक्षा घेण्यात आलेली आहे . या परीक्षेच्या निकालाच्या संदर्भात एक महत्वाची अपडेट हि कि महाराष्ट्र पोस्टल सर्कलने या १३३१ पदांच्या भरतीसाठी घेतलेल्या लेखी परीक्षेचा पेपर परीक्षर्थीना २० सप्टेंबर २०२१ पासून म्हणजे आजपासून २२ सप्टेंबर च्या रात्री १२ वाजेपर्यंत पाहण्यासाठी पोर्टलवर उपलब्ध असेल .परीक्षा दिलेल्या उमेदवारांना याद्वारे त्यांचा सोडवलेला पेपर पाहता येईल .  

            परीक्षा होऊन  ०८महिन्यांचा कालावधी होऊनही परीक्षेचा निकाल जाहीर न झाल्याने परीक्षार्थींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत आहे.काही उमेदवारांच्या  'आक्षेप ट्रॅकर  ' च्या बाबतीतील काही तांत्रिक समस्या तपासल्या जात असल्यामुळे निकालाला थोडा आणखीन वेळही  लागू शकतो ..महाराष्ट्र पोस्टल सर्कल  द्वारे निकालाच्या बाबतीत  संयम ठेवण्याचे आवाहन  करण्यात आले आहे .   .या संदर्भातील बाकी सर्व अपडेट्स 'sankalponlineworks' वर  वेळोवेळी प्रकाशित होत राहतील.


उत्तरपत्रिका पाहण्यासाठी -क्लिक करा .



*आवाहन 


'परीक्षा निकालाच्या  बाबतीतील  कुठल्याही अफवांवर विश्वास 


ठेऊ नये असे आवाहन आम्ही करू इच्छितो लवकरच पोस्टल 


सर्कल द्वारे निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल'!