गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती साठी अर्ज करायचा आहे ?असा करा अर्ज !

 

*अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती साठी अर्ज करायचा आहे ?असा करा अर्ज !




प्री-मॅट्रिक, पोस्ट मॅट्रिक आणि मेरिटकम माध्यमांवर आधारित शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करण्यास कोण पात्र आहेत?

-सहा अधिसूचित अल्प संख्यांक समाजाचे विद्यार्थी

उदा:मुस्लीम,शीख,पारशी,जैन,बौध ,ख्रिश्चन समुदायाचे विद्यार्थी जे भारतात शिकत आहेत .

*अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे -

१.विद्यार्थ्याचा पास्स्पोर्त फोटो 

२.राज्य/केंद्रशासित प्रदेशातील सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र .

३.१८ वर्षे वय पूर्ण असणार्या अर्जदाराकडे त्याचे स्वत: चे प्रमाणित समुदाय प्रमाणपत्र/१८ वर्षे पूर्ण नसल्यास सामुदायिक प्रमाणपत्र पालक/पालकाने प्रमाणित करणे आवश्यक आहे.

४.फीस भरल्याची पावती

५.मागील वर्षीचे उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र

६.बँक पासबुक

७.डोमासाईल प्रमाणपत्र

८.आधार कार्ड

९.शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र


*कसा कराल अर्ज ?

या शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल ला भेट द्यावी लागेल त्यासाठी तुम्हाला https://scholarships.gov.in/ या वेबसाईटवर जावे लागेल इथे गेल्यानंतर जर तुम्ही पहिल्यांदा अर्ज करीत असाल तर fresh application वर जावे जर renewalअसेल तर renewal लॉग इन करावे .

त्यामध्ये आवश्यक डीटेल्स भराव्या .



*नवीन पदभरती